

Kamini Kaushal biography
sakal
प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे प्रेम यशस्वी होईलच असे नाही. कधी कधी आयुष्य माणसाला अशा वळणावर आणून उभे करते की त्याला प्रेम आणि कर्तव्य यातून एकाची निवड करावी लागते. गतकाळातील एका नामवंत अभिनेत्रीच्या बाबतीत असेच काहीसे घडले होते. ही अभिनेत्री म्हणजेच दीर्घायुष्य व्यतीत करताना वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहून १४ नोव्हेंबरला काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल होत. कृष्णधवल काळापासून पडद्याला सौंदर्य देणारी व गतकाळ गाजविणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या.