
नव्या क्रीडा धोरणात पायाभूत सुविधांचा विकास केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहणार नाही. तळागाळापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वसमावेशक आणि सुलभ क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्रे व क्रीडांगणे उभारली जातील, ज्यामुळे स्थानिक प्रतिभेला वाव मिळेल. काय आहे हे नेमके धोरण, काय घडेल यातून या साऱ्या प्रश्नांची उत्तरे.