dr. babasaheb ambedkar
sakal
- अर्जुन राम मेघवाल
आधुनिक भारताचा पाया रचणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कामगार कल्याणविषयक कार्याची माहिती.
कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रनिर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रउभारणीत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी केवळ राज्यघटनेचा मसुदाच तयार केला नाही, तर प्रत्येक नागरिकाला मान आणि संधी मिळवून देणारा एका समावेशक आणि सक्षम राष्ट्राचा आराखडाच निर्माण केला. या मूलभूत मूल्यांपासून प्रेरणा घेऊन, मोदी सरकारनेही कल्याण आणि सुशासन वृद्धिंगत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.