
Youth Employment
sakal
प्रा. अपूर्वा पालकर
आजच्या तरुणांना रोजगार संधीसाठी त्यांच्यात रोजगारक्षमता असणे महत्त्वाचे झालेले आहे आणि रोजगार मिळवणे हा एक ज्वलंत विषय आहे. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक विद्यार्थी शैक्षणिक पात्रता मिळवतात, परंतु ती थेट रोजगारक्षमतेत रूपांतरित होत नाही. उद्योग, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेता, रोजगाराभिमुख अशा उद्योगस्नेही शिक्षणाची आवश्यकता आज अधिक तीव्रतेने जाणवते.