
दीपा कदम
मराठी भाषा मारहाण करून शिकून येणार नाही, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मात्र आवड, सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लळा लागावा, यासाठी प्रेमाने काय करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठीच्या हितासाठी राज्यपालांनी राज्य सरकारलाही काही गोष्टी सांगणे अत्यंत गरजेचे आहे.