
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता.३०) सुरू होत आहे. सत्ताधाऱ्यांसाठी इतर विषय तर आहेतच; पण त्यातही राज्याची अर्थव्यवस्था एक अब्ज डॉलरच्या दिशेने कशी घोडदौड करते, याचे जाहीर कौतुक केले जाणार हे उघड असेल. या पार्श्वभूमीवर ‘एमआयडीसी’तर्फे मुंबईत भव्य ‘महाराष्ट्र उद्योग संवाद’ कार्यक्रम नुकताच पार पडला. एकीकडे भव्य प्रकल्पांची उभारणी सुरू असतानाच येथे राज्यभरातून आलेल्या उद्योजकांच्या संवादातून मात्र एक वेगळेच चित्र समोर आले. बड्या उद्योगांना रेड कार्पेट अंथरताना छोट्यांकडेही लक्ष द्या, असा सूर उमटला.