

Marathi Theatre
sakal
रेश्मा देशपांडे, लंडन
‘रंगमंच युके’ प्रस्तुत ‘अहल्या’ हा दीर्घांक नुकताच ठाणे आर्ट गिल्ड ह्या संस्थेद्वारे काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सादर करण्यात आला. लंडनमध्ये स्थायिक झालेले रेश्मा विकास व विकास देशपांडे हे जोडपे ‘रंगमंच युके’ मागील प्रेरणास्थान. त्यांच्या नाटक प्रेमामुळे त्यांना लंडनमध्येही स्वस्थ बसवले नाही. मराठी नाटकाचा विचार करणारे ब्रिटनस्थित नाट्यवेडे रंगकर्मी ते जोडत गेले. हे सर्व ध्येयवेडे कलाकार शनिवार- रविवारी वेळात वेळ काढून एकत्र येतात आणि करिअरच्या व तालमींच्या कसरती सांभाळीत ब्रिटनमध्ये आणि भारतातसुद्धा प्रयोग करण्याचे स्वप्न बघतात.