
Dr. Hema Sane
Sakal
डॉ. जयंत गाडगीळ
सानेबाईंना जेव्हा पहिल्यांदा पाहिले, तेव्हापासूनच हे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे, हे लक्षात आले होते. पण तो माझ्या आयुष्यातला केवढा महत्त्वाचा भाग्ययोग आहे, हे आज ४५ वर्षांनी लक्षात येत आहे. गरवारे कॉलेजला कनिष्ठ महाविद्यालयापासून त्या आम्हाला शिकवायला होत्या. वर्गात फळ्यासमोर उभे राहिल्या, की त्यांचे स्मित, आत्मविश्वास आणि लुकलुकणारे डोळे, बोलण्याची ढब आणि फळ्यावरचे सुटेसुटे अक्षर, रेखीव आकृत्या या सगळ्यांनी आमच्या मनाचा ठाव त्यानी कधी घेतला समजलेच नाही.