प्रेम लाभे प्रेमिकाला

मृणालिनी चितळे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मी  रस्ता ओलांडला तर समोर स्मिता आणि तिची मुलगी नेहा. सोबत असलेल्या "ब्रुनो'ला साखळीनं बांधलं आहे, याची खात्री पटल्यावर मी थांबून विचारलं, "काय गं, इकडे कुठे?'
"डॉक्‍टरांकडे. जरा ओबेसिटीचा प्रोब्लेम झालाय.' "काहीतरी फॅड आहे तुझं.' "माझं नाही, आमच्या ब्रुनोचं वजन वाढलंय.' डॉक्‍टर म्हणाले, आधी त्याची कॅडबरी सोडवा. पण तो ना, कॅडबरी दिल्याशिवाय फ्रीजपासून हलतच नाही. सारखा फ्रीजवर पाय आपटत बसतो. आता डॉक्‍टरांनी काही टिप्स दिल्या आहेत, कॅडबरी सोडविण्यासाठी.

"अशाच टिप्स इतर सवयींबद्दल द्यायला हव्यात. मुख्य म्हणजे टॉयलेटच्या. रस्त्यात इथंतिथं  बसायचं म्हणजे काय? शिवाय कुत्र्यांना आवडत नाही म्हणून फिरायला नेताना साखळी न बांधणं म्हणजे कुत्र्याविषयीच्या नि स्वत:विषयीच्या विश्वासाची फाजील लक्षणं...' अर्थात ही वाक्‍यं मी माझ्या सवयीप्रमाणे मनातल्या मनात म्हणाले.

त्यानंतर काही दिवसांनी मी स्मिताकडे गेले, तर नेहाचे डोळे रडून सुजलेले. समोरच्या  टेबलवर "गेट वेल सून' अशा आशयाची शुभेच्छापत्रं. माझ्या छातीत धस्स झालं. नेहानं रडवेल्या सुरात सांगितलं की चार-आठ दिवसांपूर्वी बंगल्यातून बाहेर पडलेला "ब्रुनो' कुणाच्या तरी गाडीखाली आला. त्याचे मागचे दोन्ही पाय जायबंदी झाले. नीरज आणि स्मिता त्याला आता रुग्णालयातून घरी घेऊन येणार होते. तिला सोडून माझा पाय निघेना. तासाभरानं नीरज आणि स्मिता "ब्रुनो'ला घेऊन आले. घरी तयार केलेल्या झोळीवजा स्ट्रेचरवर ठेवून त्याला अलगद आत आणलं आणि त्याच्या बिछान्यावर ठेवलं. स्मितानं त्याचं डोकं मांडीवर घेतलं. नीरज नि नेहा त्याला थोपटत राहिले. "ब्रुनो'सकट सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी टपटपत होते.

अधूनमधून फोन करून मी "ब्रुनो'ची चौकशी करत होते. त्याचे मागचे दोन्ही पाय कायमस्वरूपी अधू झाले होते. आपल्या चार पायांवर तो कधीही उभा राहू शकणार नव्हता. अशा अपंग प्राण्याला सांभाळणं किती क्‍लेशकारक होत असणार, हे मी समजू शकत होते. स्मिता सांगायची, "मी त्याला फिजिओथेरपीची ट्रीटमेंट सुरू केली आहे. उद्यापासून होमिओपॅथी देऊन बघणार आहे.' चार-सहा महिन्यांनी मी स्मिताकडे गेले आणि समोरचं दृश्‍य पाहून थक्क झाले. चार चाकं लावलेल्या फळीवर "ब्रुनो' विराजमान झाला होता. नीरजनं त्याच्यासाठी हा पांगुळगाडा बनवून घेतला होता. पुढच्या दोन पायांनी चाकांना गती देऊन "ब्रुनो' घरभर बागडत होता. आता जेव्हा कधी मी स्मिताकडे जाते, तेव्हा तिच्या परवानगीनं "ब्रुनो'साठी कॅडबरी घेऊन जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial