नितीन राऊत
नितीन राऊत

कोरोनाने दगावलेल्या रुग्णांवर व्हावे निःशुल्क अंत्यसंस्कार : नितीन राऊतांच्या महापालिकेला सूचना

नागपूर : शहरातील दहनघाटांवर कोरोनामुळे मृत्यू ओढवलेल्या रुग्णांवर निःशुल्क अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यासाठी शोकाकुल परिवाराला लाकडे, गोवऱ्या मोफत उपलब्ध करून द्याव्या, अशू सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मनपाला केली.

नितीन राऊत
सूतिकागृहात ७० ऑक्सिजनयुक्त बेड्सची सुविधा; ऑक्सिजन प्रकल्पही उभारण्याचं महापौरांचं आश्वासन

कोरोनासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या २४ तासात ८५ बाधितांचा मृत्यू झाला. कोरोना बाधितांना आरोग्य तपासण्या, औषधोपचार, रुग्णवाहिका आणि रुग्णालयांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

एवढे करूनही रुग्ण दगावल्यास मनपाच्या सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई आणि मानकापूर या सहा दहनघाटांवर विद्युत वाहिनीमध्ये अंत्यसंस्काराची नि:शुल्क सेवा दिली जाते. मात्र, लाकडे आणि गोवऱ्यांद्वारे अंतिम संस्कार करायचे असल्यास सुमारे दोन हजार ५३० रुपयांचा खर्च नातेवाईकांना करावा लागतो. ऐनवेळी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते.

नितीन राऊत
हृदयद्रावक! उपचाराअभावी कोरोनाग्रस्तानं प्रवासी निवाऱ्यात तडफडून सोडले प्राण; ब्रह्मपुरीतील घटना

सहा घाटांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी अंत्यसंस्काराची निःशुल्क सेवा आहे. परिस्थिती लक्षात घेऊन सर्वच घाटांवर कोरोना रुग्णांवर निःशुल्क अंत्यसंस्काराची सेवा महापालिकेने द्यावी. मृत मनपाचा करदाता असल्याने मानवतेच्या भावनेतून मनपाने मोफत सेवा देणे अपेक्षित आहे. मृतदेहावर परंपरागत पद्धतीनुसार अंतिम संस्कार व्हावेत, अशी परिवाराची इच्छा असणे स्वाभाविक आहे. अनेक आप्तस्वकीय परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्काराचा आग्रह धरतात. लाकडे-गोवऱ्या रचून एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात. मात्र, विद्युत दाहिनीमध्ये क्रमाक्रमाने अंत्यसंस्कार होत असल्याने वेळ लागतो. मनपाने लाकडे आणि गोवऱ्यांचा खर्च स्वत: करून मृताच्या नातेवाइकांना दिलासा द्यावा, अशी सूचना राऊत यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com