ढिंग टांग : पती गयो...!

मोटाभाई गुडघे चोळत पायऱ्यांवर बसून आहेत. नमोजीभाईंच्या हातात दाणे!! मोर अचानक सावध होतात.
narendra modi oath ceremony bjp nda tdp jdu nitish kumar chandrababu naidu president murmu
narendra modi oath ceremony bjp nda tdp jdu nitish kumar chandrababu naidu president murmuSakal

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग. वेळ ः बप्पोरे. प्रधानसेवकांच्या निवासस्थानी मोरांचा नाच सुरू आहे. पुढ्यात फक्त दोन प्रेक्षक. खुद्द प्रधानसेवक नमोजीभाई आणि प्रधानसेवकांचे सेवक मोटाभाई. मोरांना दाणे खिलवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

मोटाभाई गुडघे चोळत पायऱ्यांवर बसून आहेत. नमोजीभाईंच्या हातात दाणे!! मोर अचानक सावध होतात. कुणीही असे दाणे फेकायला लागले की त्यात काहीतरी पोलिटिकल गेम आहे, येवढे दिल्लीच्या मोरांना बरोब्बर कळते. अब आगे...

नमोजीभाई ः (मोरांना आमिष दाखवत) ऑ ऑ ऑ ऑ…अरे आगळ आव ने गधेडा! भरुचनी प्रख्यात सेंग छे! खावो, खावो!! (गधेडा म्हटल्यामुळे दोन-चार मोर दुखावतात.)

मोटाभाई ः (दीर्घ सुस्कारा सोडत) जवां दो! हवे चूंटणी तो थई गई!! जान बची, लाखो पाये!!

नमोजीभाई ः (समजूत घालत) शुं थयु मोटाभाय? एटला मायुस मोडु शा माटे?

मोटाभाई ः (डोळ्यातली आसवं पुसत) चारसोपार जावानां हता! त्रणसोपार पण नाय झ्याला!! (एक नतद्रष्ट मोर दुसऱ्या मोराला टाळी देतो! काँग्रेसवाला मेला!!)

नमोजीभाई ः (दिलासा देत) तमे चिंता ना करो, मोटाभाय! हुं छुं ने?

मोटाभाई ः (हुंदका आवरत) मने तो बहु दुख होये छे! असा कसा झ्याला? मी किती मेहनत केला होता!!

नमोजीभाई ः (थोडक्यात समाधान मानत) सरकार तो आपडोज छे ने!! बद्धा इंडिया आपडोज छे!

मोटाभाई ः (रागारागाने) इंडियाचं नाव घेऊ नका!! (दोन-तीन मोर घुश्शानं बघतात. महाराष्ट्र आणि युपीवाले मेले!! बंगालीही असू शकतील...हु नोज?)

नमोजीभाई ः (हसत) अरे, वो इंडिया नथी, आपडा देस इंडिया!! ‘पहले देस, फिर दल, अंत में ‘स्वयं’वाळा इंडिया!!

मोटाभाई ः (चिंताग्रस्त होत) युपी अने घाटी लोगने सबक सिखवु पडशे!! एवढा रोडसो केला, रेली केला, पण व्होट नाय दिला!! हवे आपडे शुं करवानुं? (दोन मोर पुन्हा एकमेकांना टाळी देतात!)

नमोजीभाई ः (अचानक आठवून) सपथविधी समारोह क्यारे छे? हुं नवुं नवुं जाकीट पहनीश!!

मोटाभाई ः (सहज विचारल्यागत) आजेच छे! तमे केसरिया रंगाच्या जाकीट घाला!! बहु सारु लागे छे!! आपडो लाडलो केसरिया!!

नमोजीभाई ः (कान पकडत) ना रे बाबा ना! हवे केसरिया भूली जावो! ब्लू कलर इज ओलवेज सेफ!!

मोटाभाई ः (गोंधळात पडत) पती गयो! चंद्राबाबू पण निळ्या रंगाच्या जाकीट घालून येणार आहेत! (एक हैद्राबादी मोर पिसारा फुलवतो.)

नमोजीभाई ः (खुशीत) च्यालसे!!

मोटाभाई ः (आणखी काळजीत पडत) मरी गयो!! नितीसबाबू पण निळ्या रंगाच्याच जाकीट घालणार!! (एक बिहारी मोर पिसारा फुलवून पाठमोरा होतो..)

नमोजीभाई ः (आणखी खुशीत) ए पण च्यालसे!! लोकतंत्र मां ए तो हमेसा च्याले छे! आमच्या तिघांच्या कलर सेम टु सेम! मने तो लागे आ सुभसकुन छे!!

मोटाभाई ः (कडवटपणाने) त्रण तिघाडो, अने काम बिगाडो!! आपल्या दोघांच्या किती च्यांगला च्यालला होता! बे जण अने बे टर्म!! केटला सरस टाइम हता!!

नमोजीभाई ः (समाधानाने) हवे अमणा टीम वर्क थी काम करवानुं! सबका सांथ, सबका विस्वास अने सबका जाकीट फस्क्लास!!

मोटाभाई ः (खोल आवाजात) मने तो लागे आपडी थर्ड टर्म एकदम थर्डक्लास छे!! थर्ड टर्म विथ थ्री पीएम!!

दाणे टिपताना मोर खुदखुदत असतात. ‘बरी घडली अद्दल’ असा बेरकी भाव त्यांच्या दाणे टिपण्यात दिसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com