‘तिचं क्षितिज’ : पुनर्रचना की व्यूहरचना?

महिला आरक्षणाच्या ऐतिहासिक टप्प्यामागे मतदारसंघ पुनर्रचना, उत्तर-दक्षिण सत्तासंतुलन आणि वाढत्या महिला मतदारशक्तीचे राजकीय गणित; ‘तिचं क्षितिज’ खऱ्या सशक्तीकरणाचे की नियंत्रणाच्या नव्या चौकटीचे प्रतीक?
Historic Milestone: Understanding the 106th Constitutional Amendment Act, 2023

Historic Milestone: Understanding the 106th Constitutional Amendment Act, 2023

Sakal

Updated on

प्रज्ञा शिदोरे

संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन अधिनियम (संविधानातील १०६ वा दुरुस्ती कायदा, २०२३) हा भारतीय लोकशाहीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. सध्या देशाच्या कायदेमंडळात महिलांचे प्रमाण सुमारे १५ टक्क्यांवरच मर्यादित आहे; त्यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यामुळे संसद अधिक समावेशक, विविधतेने समृद्ध आणि धोरणनिर्मितीत लिंग-संवेदनशीलता येईल, अशी अपेक्षा केली जाते. मात्र, या आरक्षणाची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेशी जोडली आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम २०२९ नंतरच दिसणार आहे आणि नेमकी हीच गोष्ट या निर्णयामागील राजकीय गणितं समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com