
Navi Mumbai Airport
Sakal
मुरलीधर मोहोळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला मिळणारी ही सुविधा. ती राज्याला नव्या युगात नेणारी ठरेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार, दळणवळण व पर्यटनाचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर दररोज शेकडो उड्डाणे होत असून, प्रवाशांचा आकडा वर्षागणिक विक्रमी वाढत आहे. मात्र, जागेअभावी विस्तार मर्यादित असल्याने वाढत्या हवाई वाहतुकीचा भार सांभाळणे कठीण झाले आहे.