

Pandurang Shastri
sakal
राजेंद्र खेर
बुद्धिनिष्ठ भाव आणि श्रद्धा ठेवून मनुष्याचे आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकते हे पांडुरंगशास्त्रींनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले. म्हणूनच आत्तापर्यंत जगात ज्या क्रांती झाल्या त्याला पांडुरंगशास्त्रींनी ‘भावनिक’ आणि ‘आध्यात्मिक’ क्रांतीची जोड दिली असे म्हटले जाते. डोकी उडवून किंवा द्वेष करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हीच विचारधारा मनुष्याला तारू शकेल, त्याचे जीवन दैवी बनवू शकेल, असा त्यांचा विश्वास होता आणि तो त्यांनी स्वाध्याय परिवाराच्या संदर्भात सार्थ करून दाखवला.