Pannalal Suryana
sakal
संपादकीय
समाजवादी चळवळीतील प्रेरणास्रोत
समाजवादी चळवळीचे आधारस्तंभ पन्नालाल सुराणा यांच्या कार्यात साधेपणा, सेवा आणि लोकशाही मूल्यांची ठाम बांधिलकी दिसून येते. त्यांच्या सहवासातील प्रेरणादायी आठवणी कार्यकर्त्यांना दिशा देणाऱ्या आहेत. त्यांचे विचार, शिस्त, मानवतावादी दृष्टिकोन आणि समाजवादी चळवळीतील योगदान आजही अनेकांना मार्गदर्शक आहेत.
उपेंद्र टण्णू
तो काळ होता आणीबाणीचा. मी त्यावेळी सहावीत होतो. जळगावच्या रेल्वे स्टेशनवर. आम्ही पुण्याला जाण्यासाठी जळगावच्या रेल्वे स्टेशनवर थांबलो होतो. तेथे एक उंचपुरा धिप्पाड साधू उभा होता. त्याने वडिलांना खुणावत त्याच्याजवळ बोलावले. वडील त्यांच्याजवळ गेले आणि ते बराच वेळ त्यांच्याशी बोलत होते.

