

Political Satire: The 'Cake Cutting' Politics in Maharashtra
Sakal
आदूबाळ : (फोन फिरवत) हाय देअर, विश यु मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे!! वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!!
अमूबाळ : (चक्रावून) मिलियन थँक्स ब्रो! पण मघाशीच तू येऊन गेलास ना? मी केक कापला, तू टाळ्या वाजवल्यास? हीऽऽ गर्दी झाली होती! मग आपण फोटोबिटो काढले!...हे सगळं स्वप्नात घडलं की काय?
आदूबाळ : (बंधुप्रेमाने सद्गदित होऊन) नाही रे ब्रो! मी येऊन गेलो हे खरंय! तू भलामोठा केक कापलास, हेसुद्धा खरंय! मी टाळ्या वाजवल्या, तुला मोदीजी स्टाइल मिठी मारली, हेही खरंय!! पण वाटलं, घरी पोचल्यावर तुला फोनवरुन पुन्हा एकदा विश करायला हवं!!
अमूबाळ : (कंठ दाटून येत) किती प्रेम आहे रे तुझं माझ्यावर...आधी का नाही भेटलास?
आदूबाळ : (विषय बदलत) ते जाऊ दे! आज काय स्पेशल? कशी झाली बर्थ डे पार्टी?
अमूबाळ : (ढेकर देत) ऑऊब्ब!...मस्त...मी तीन आंबे खाल्ले!!
आदूबाळ : (च्याट पडत) अरेच्चा, आज संडे आहे ना!! नो पार्टी?
अमूबाळ : (आज्ञाधारक सुरात)...बाबा नको म्हणाले!