

Political Satire: The Mystery of 'Chunaav-Chori' Decoded!
Sakal
बेटा : (नेहमीप्रमाणे एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (नेहमीप्रमाणे पक्षकार्यात बिझी...) हं!
बेटा : (उत्साहाने) मम्मा, केरळम विजयम प्राप्तम! अभिनंदन नाही का करणार?
मम्मामॅडम : (प्रसन्नपणाने) हार्टी काँग्रॅच्युलेशन्स! तू आणि दिदीनं फारच उत्तम काम केलंत! केरळमचा निकाल ऐकून अगदीच अनिराळम निराळम वाटतंय...
बेटा : (अभिमानाने) हमारी मेहनत रंग लाई! केरळममधले लोक प्रेमळम आहेत!! माझ्या मुहब्बत की दुकानचं त्यांनी स्वागतम केलं! तिथं लोकशाही जिवंत आहे!
मम्मामॅडम : (आठवणीनं) हे बघ, तुझ्यासाठी टेबलावर इडली आणि सांबार ठेवलंय...खाऊन घे हो!!