आठवेल का सारे?

prof raja aakash
prof raja aakash

असा कुठलाही माणूस नाही, की जो सांगू शकेल, आपण एका दिवसात किती माहिती लक्षात ठेवू शकतो. कधी कधी आपली स्मरणशक्‍ती खूप तत्परतेनं काम करते, आपण कुठलंही ज्ञान चटकन आत्मसात करतो. दीर्घकाळ अभ्यास करतो. दीर्घकाळ एकाग्र होऊ शकतो. पण अचानक एखाद्या दिवशी या सर्व गोष्टी थांबतात. आपल्याला असं वाटतं, की आपली लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. अगदी साध्या साध्या गोष्टीही डोक्‍यात शिरत नाहीत. आपल्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेबद्दल आपल्याला शंका येऊ लागते. स्मरणशक्‍ती कमी झाली असं वाटायला लागतं. पण आपली लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली हे खरं नसतं. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अशी स्थिती येते. याला आम्ही ‘डेड लेव्हल ऑफ लर्निंग’ असं म्हणतो. अशी स्थिती कधी येईल हे नेमकं कुणालाच सांगता येत नाही. पण एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरवात केल्यावर अचानक एखादेवेळी ‘डेड लेव्हल ऑफ लर्निंग’ येते.

आपल्या लक्षात येतं, की खूप प्रयत्न करूनही आपल्या लक्षात राहत नाही, तेव्हा आपण निराश होतो. पण ही अवस्था ‘नॉर्मल’ आहे. यात निराश होण्यासारखं काहीही नाही. कुठलाही नवीन विषय तुम्ही हाती घेता, त्या वेळी स्मरणशक्‍ती प्रभावीपणं कार्य करते. कारण कुठल्याही विषयाबाबत त्याची प्राथमिक माहिती समजून घ्यायला सोपी असते. त्यामुळे अशा सोप्या माहितीच्या रस्त्यावर तुम्ही आपोआप पुढे जाता. एखाद्या विषयाचे प्राथमिक ज्ञान मिळवताना ते लक्षात ठेवण्याची आपली क्षमता जास्त असते. त्या विषयाच्या खोलात आपण शिरतो, तेव्हा माहिती अधिक गुंतागुंतीची होत जाते. ज्या गोष्टी आपण कधीच ऐकल्या नाहीत, अशी माहिती आपल्यावर येऊन आदळते. अशावेळी लक्षात ठेवण्याची प्रक्रिया, स्मरणक्षमता मंदावते. असं वाटायला लागतं, की आपण यातलं काहीच लक्षात ठेवू शकणार नाही, आता आपली क्षमता संपली. पण असं नसतं. तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता ‘डेड लेव्हल’ला आली याचा अर्थ ती संपली, असा होत नाही. ‘डेड लेव्हल ऑफ लर्निग’ आली असेल, तर निराश न होता सहजतेनं आपले प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. १) तुमची सुरवातीची आवड आणि त्या विषयाचं प्राथमिक ज्ञान या आधारे ‘डेड लेव्हल’वरून तुम्ही सहज तरून जाऊ शकता. २) लक्षात ठेवण्याची क्षमता थोडी कमी झाली असं वाटतं, पण ती शून्य होत नसते. ३) पुढचा गिअर टाकल्यावर गाडीचा वेग वाढतो, तसाच ‘डेड लेव्हल’ संपल्यावर स्मरणक्षमता वाढते. ४) स्मरणशक्‍ती पूर्वीपेक्षा प्रभावीपणे काम करते आहे, हे तुमच्या लक्षात येईल. हे ऐकायला जितकं सोपं वाटतं, प्रत्यक्ष कृतीत उतरवायला त्याहीपेक्षा सोपं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com