लक्ष एकाग्र करण्यासाठी...

prof raja aakash
prof raja aakash

सर्वांची एक समान समस्या असते, ती म्हणजे मन एकाग्र होत नाही. एखाद्यानं काम करायला सुरवात केली, पण काम अथवा अभ्यासाचा मूड येत नाही. दहा-पंधरा मिनिटांत एकाग्रता भंग होते, कंटाळा येतो. मनात भलतेसलते विचार येऊ लागतात. विचाराच्या तंद्रीत हरवून तो यांत्रिकपणे काम करू लागतो; पण आपण काय करतोय, यातली एकही गोष्ट त्याला आठवत नाही. मग कंटाळून काम अर्धवट ठेवले जाते. ‘आज राहूदे, उद्या बघू’ असा विचार केला जातो, पण रोज असंच होतं. जेव्हा इतर लोक मौज करतात, उदा. सायंकाळी, तेव्हा कामात लक्ष लागणार नाही. थकलेले असाल, तर लक्ष लागणार नाही. टीव्हीसमोर सोफ्यावर पडून काम, अभ्यास करत असाल, तर लक्ष लागणार नाही. पोटभर जेवण झाल्यावर लगेच कामात लक्ष लागणार नाही. वेळा व जागा सतत बदलत असाल, तर लक्ष लागणार नाही. एक तास टीव्ही पाहिला किंवा चॅटिंग केलं व लगेच कामाला लागलात तर लक्ष लागणार नाही. याशिवाय आणखीही कारणं असू शकतात. आपल्याला कामावर अथवा अभ्यासात लक्ष केंद्रित करायला शिकायचं असेल व एकाग्रता वाढवायची असेल, तर काही उपाय करता येतील.

१) मनापासून काम करायचं असेल तर विशिष्ट वेळ आणि जागा ठरवा. त्या अशा ठरवा की जेव्हा तुम्हाला इतर कोणत्याही कामांचा अडथळा होणार नाही. रोज त्याच वेळेला ते काम करण्याची सवय लावा. म्हणजे ती वेळ आली की आपोआप ते करण्याचा मूड येईल. २) आपल्याला तीन-चार तास काम  करायचं असेल, तर फार थकवा येईल अशा गोष्टी करू नका. उत्साह कायम ठेवा. खूप थकलेले असाल तर काम नीट होणार नाही. झोप येईल. असं असलं तर थोडी विश्रांती घ्या. ३) जेवण झाल्यावर लगेच अभ्यासाला बसू नका. असं केल्यानं सुस्ती येते. आपण काय वाचतोय ते डोक्‍यात शिरत नाही. जेवणानंतर किमान एक तासांची गॅप घ्या, मग अभ्यासाला बसा किंवा शक्‍य असेल तर आधी अभ्यास करून मग जेवण करा. ४) आपल्या मनाला सवय असते एकावेळी ४० ते ५० मिनिटे काम करण्याची. दीर्घकाळ काम करायचं असेल, तर दहा मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. त्यामुळे पुुन्हा पुढची ४०-५० मिनिटे मन एकाग्र करता येईल. ६) अभ्यासाची एकाग्रता वाढवण्यासाठी, आकलन शक्ती वाढवण्यासाठी, दमसास वाढवण्यासाठी, मनातील ताण, चिंता, थकवा कमी करण्यासाठी मनाला रिलॅक्‍स करणाऱ्या पद्धती वापरा. त्यात प्राणायाम, ध्यान, शवासन यांचा चांगला उपयोग होतो. या पद्धती वापरून आपण कामात, अभ्यासात लक्ष एकाग्र करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com