प्रकाश आंबेडकरांवरील हेत्वारोप अन्याय्य 

प्रतीक वि. जाधव, पुणे
शनिवार, 16 मार्च 2019

"कोणी कोणाचे ऐकेना' या "सकाळ'च्या अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला मदत करतात, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

"कोणी कोणाचे ऐकेना' या "सकाळ'च्या अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला मदत करतात, असा ठपका ठेवण्यात आला आहे. इतरही काही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा रीतीने आरोप केले आहेत. या सर्वांच्या म्हणण्याचा गर्भितार्थ असा असतो, की सध्याच्या मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर कॉंग्रेसप्रणित आघाडीच्याच छावणीखाली गेले पाहिजे.

तसे न केल्यास याचा अर्थ भाजपला मदत असा होईल, असा घेतला जातो. एवढेच नव्हे तर तसा हेत्वारोपही केला जातो. निवडणुकीच्या अंकगणितात आपण इतके रमलो आहोत, की साध्या लोकशाही हक्कांचाही विसर पडलेला आहे. सर्वच राजवटींच्या दुर्लक्षामुळे जो वंचित राहिलेला घटक आहे, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदारांपुढे जाण्याचा अधिकार प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्याला नाही का? या विशाल, खंडप्राय देशात, कमालीचे स्तरीकरण असलेल्या समाजात एखाद-दुसरा पक्ष वा आघाडीच लोकांचे प्रतिनिधित्व करेल, असे मानणे योग्य नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Prakash Ambedkar