अर्ज किया है..! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 जानेवारी 2019

""अर्ज करुन ऱ्हायलो, बावा, सुन ले..."उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब...'' 
""उव्वाह व्वाह...उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब... क्‍या खूब कहा...'' बोटांचा पाचुंदा व्हटांशी आणून आम्ही कळवळून दाद दिली. "काय अशक्‍य ओळ आहे बावा' असे शेजारच्या रसिकाला उद्देशून सांगितले. "कहर कहर!' अशा आरोळ्यांनी अवघी महफिल दणाणून गेली. 

""अर्ज करुन ऱ्हायलो, बावा, सुन ले..."उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब...'' 
""उव्वाह व्वाह...उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब... क्‍या खूब कहा...'' बोटांचा पाचुंदा व्हटांशी आणून आम्ही कळवळून दाद दिली. "काय अशक्‍य ओळ आहे बावा' असे शेजारच्या रसिकाला उद्देशून सांगितले. "कहर कहर!' अशा आरोळ्यांनी अवघी महफिल दणाणून गेली. 

""उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब...'' 
""क्‍यूं भई क्‍यू... बताओ तो सही...'' एका घायाळ रसिकाला तत्काळ उत्तर हवे होते. तो हळहळला. 
""उनसे कह दो के न बेचें... बेचें हं... सुनियो... उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब...'' 
...आता मात्र कहर झाला होता. शेर पुढे बढत नव्हता आणि आमचे कुतूहल शिगेला पोचले होते. 
"उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब.. हम उनको देखते है, फिर आईना भी देखते है..'' शायराने शेर पुरा केला आणि मेहफलीचे छप्पर उडाले. दाद टाळ्यांचे रुमाल छताला जाऊन भिडले. 

"माशाल्लाह, माशाल्लाह! क्‍या शेर फर्माया है... सौ सुनार की एक लुहार की भौ!''आम्ही रंगात येऊन सणसणीत नागपुरी टाळी हाणली. शायराने कळवळून हात मागे घेत स्वबगलेत दाबला, तेव्हा बहुधा आणखी एखादा जहरी शेर पुटपुटला असावा, असा आमचा कयास आहे. कां की तो नीट ऐकू आला नाही. 
""बर्खुर्दार ताली देते हो तो समझ के दैय्यो, 
वरना हमारे नसीब की रेखाएं लै जैय्यो!'' 

...शायर जिंदादिल होता. आमच्या टाळीवरही त्याने असा काही नंबरी शेर पढला की आमचा भेजा उडून त्याची पार सांबारवडी झाली!! असो. शायर होते नागपूरचे नामाबर शायर नक्‍श नागपुरी रास्तेवाले !! रास्तेवाले हे त्यांचे तखल्लुस आहे. रास्तेवाल्यांची शायरी कोणाला माहीत नाही? कुठलाही मुशायऱ्यात रास्तेवाल्यांची एण्ट्री झाली की बाकीचे शायर गप्प राहून श्रवणभक्‍ती तेवढी करतात. 

"और भी है दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, 
लेकिन रास्तेवाले का है अंदाजे बयां और...' हा शेर फेमसच आहे. नक्‍श नागपुरी ह्यांचा शायरी व्यतिरिक्‍त रस्ते बांधण्याचा छंद आहे. त्यांच्या ह्या जगावेगळ्या छंदापायी त्यांचे नाव रास्तेवाले असे पडले. (असे म्हणतात.) 

"सरजमीं से फलक तक बनाऊंगा आठ लेन की राह... तुम तक जो पहुंचती है... तू इंतजार कर...' अशी त्यांची एक जबर्दस्त शायरी होती. त्याची अनेकांनी पारायणे केली होती. आम्ही तर इन्शाल्ला रास्तेवाल्यांचे पुराने मुरीद आहो!! आत्ता ह्या घटकेलाही त्यांच्याच मैफलीत आम्ही शरीक झालो होतो... 
""ऐसे शेर पढोगे, तो चुनाव में सारे के सारे व्होट आप के नाम...'' मैफलीतला एक रसिक मध्येच म्हणाला. 

"हाओ भौ!..असे शेर पढलेत तं जनता काहून देणार नाही मतं तुम्हाले?'' आम्हीही भक्‍तिभावाने म्हणालो. 
""हूट..कुणी सांगितलं बे? शेर पढून मतं भेटतात का भैताडा!'' नक्‍श नागपुरी रास्तेवाल्यांनी समोरच्या प्लेटीतली एक सांबारवडी तोंडात टाकून आम्हाला झापले. आम्ही च्याट पडलो. मग मते मिळवण्यासाठी काय करावे बरे? अं? 

"मतं मिळवण्याचा मार्ग एकच... लंब्या लंब्या फोका मारणे!'' रास्तेवाल्यांनी अखेर गुपित फोडले. म्हणाले, ""अर्ज किया है...'' इर्शाद इर्शादचा पुकारा झाला. 
"सपने दिखाकर दिल को चुराना आदत में है खोट, 
पीटेगा तू बाद में बंदे, अभी मिलेंगे व्होट!' 

- ब्रिटिश नंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Thing Tang Article