सुरक्षित पुण्यासाठी हवी कठोर मोहीम

मध्यरात्री नंतरही शहराच्या कोणत्याही भागात मुली दुचाकीवरून सहज फिरू शकतात
pune
punesakal

‘मध्यरात्री नंतरही शहराच्या कोणत्याही भागात मुली दुचाकीवरून सहज फिरू शकतात,’ ही पुण्याची आजवरची ख्याती. सर्वात सुरक्षित शहर म्हणूनच जगभरातील पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. पण शहाराची प्रवेशद्वारे असणाऱ्या विमानतळ, रेल्वे स्थानके, एसटी स्थानकांच्या बाहेरचे वातावरण सुरक्षित शहराच्या प्रतिमेला पहिला धक्का देतात. त्यामुळे ‘सुरक्षित पुण्यासाठी’च्या उपाययोजनांमध्ये ही सर्व ठिकाणी अधिक सुरक्षित, शिस्त आणि कायद्याचे पालन करणारी व्हायला हवीत.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आतापर्यंत तब्बल १६ आरोपी यात सामील असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घृणास्पद आणि शहराला काळिमा फासणाऱ्या घटनेबद्दल वरवरच्या मलमपट्टीच्या उपाययोजना करून चालणार नाही, तर पुणे शहर हे इतर महानगरांपेक्षा वेगळे आणि सुसंस्कृत शहर आहे. येथे चुकीच्या वागणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई होते, हा संदेश अशी कृत्य करणाऱ्या नराधमांसह बाहेरून येऊन नियम न पाळणाऱ्या प्रत्येकापर्यंत जायला हवा.

pune
महापौरांच्या रामायण बंगल्यावर महाभारत! कर्मचाऱ्यांत हाणामारी 

काही दिवसांपूर्वी विमानतळावरून घरी येण्यासाठी विमानतळाबाहेर सहज रिक्षाची चौकशी केली. एकही रिक्षाचालक मीटरवर येण्यास तयार नव्हता. कात्रजला जाण्यासाठी एकाने नऊशे, एकाने साडेआठशे रुपये सांगितले. एवढे का? विचारताच एकजण अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलला, मी पुण्यातलाच असल्याने माझ्या भाषेत मी त्याला उत्तर दिले. पण बाहेरच्या व्यक्तींचे काय होतं असेल? हा अनुभव सांगण्याचा हेतू एवढाच की, विमानतळ असो, रेल्वे स्टेशन की एसटी स्टँड सर्वत्र हीच अवस्था आहे. रात्रीच्या वेळी तर या ठिकाणचे अनुभव भयंकर असतात. मग आपले पोलिस प्रशासन, आरटीओ या यंत्रणा करतात काय? एकतर रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर यांनी गणवेश घालणे, बॅज लावणे सक्तीचे आहे. पण त्याचे पालन होत नाही. सर्व स्थानकांवर प्रिपेड रिक्षा, टॅक्सी उपक्रम सुरू केला होता, बहुतेक ठिकाणी तो बंद आहे. कोणीही उठतो, त्याला हवे ते पैसे सांगतो यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

रिक्षाचालक, कॅब यांची नियमित तपासणी होत नाही. प्रवासी नाकारणे, त्यांच्याकडून जादा पैसे वसूल करणे, त्यांना रस्त्यात लुटणे अशा अनेक प्रसंगाची पोलिसांकडे नोंद नसते किंवा कोणतीही गंभीर कारवाई होत नाही. कायद्याचा धाक, भीती न उरल्यानेच १६ जण उघडमाथ्याने मुलीवर ठिकठिकाणी अत्याचार करण्याचे धाडस करतात. हे न पटणारे आहे, यंत्रणांचे अपयश आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी संवेदनशील होऊन काम करावे लागेल.

पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी रिक्षाचालकांची सुसंस्कृत संघटना उभी केली. त्यांच्यावर मूल्यांचे संस्कार केले, मात्र सध्याची परिस्थिती बिघडलेली दिसते. संघटनांचाही धाक, दबाव कमी झालेला दिसतो. परमीट एकाचे आणि व्यवसाय करणारा चौथा-पाचवा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संघटनांनी पुनर्बांधणी करून चुकीच्या लोकांना बाहेर काढायला हवे. हे शहर आपले आहे, ते सुरक्षित राहिले नाही तर कधी ना कधी त्याची झळ प्रत्येकाच्या घरापर्यंत बसणार आहे, हे भान ठेवून योग्य त्या सुधारणा होतील, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com