
Gajanan Bhaskar Mehendale
sakal
मोहन शेटे
चौदा सप्टेंबरची सकाळ! ‘शिवशंभू विचार मंच’चे महाराष्ट्रातल्या गावागावातून आलेले तरुण अभ्यासक! व्याख्यान ऐकायला उत्सुक झालेले.... आणि व्यासपीठावर साक्षात गजानन भास्कर मेहेंदळे! वाणीचा गंगौघ वाहू लागतो. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की अभिनिवेश नाही. शांतपणे, नर्मविनोदी शैलीत ज्या तथाकथित फर्मानाद्वारे औरंगजेब धर्मसहिष्णू होता, हे दाखवण्याचा खटाटोप आजवर करण्यात आला, ते फर्मानच कसे बनावट आहे, हे सप्रमाण सिद्ध केले जाते.