
Jayaprakash Narayan
Sakal
सी.पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती
गंगा आणि घागरा नद्यांच्या संगमावरील, धर्म, संस्कृती आणि ज्ञानाच्या बिहारभूमीत सिताबदियारा या गावात, ११ ऑक्टोबर १९०२ रोजी जयप्रकाश नारायण (जेपी) यांचा जन्म झाला. यावर्षी आपण ‘संपूर्ण क्रांती’च्या या शिल्पकाराची १२३ वी जयंती साजरी करत आहोत. देशातील गरिबांना नेहमीच त्यांनी आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवले. त्यांना मिळालेला ‘लोकनायक’ हा किताब कोणा एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाने दिलेला नाही,तर पाच जून १९७४ रोजी पाटण्याच्या गांधी मैदानात एकत्र जमलेल्या लाखो भारतीय नागरिकांनी प्रेमाने त्यांना हा किताब प्रदान केला आहे.