
Marathwada Floods
sakal
विकास देशमुख (९८५०६०२२७५)
नागरी व्यवस्था जिथून उगम पावली, ते स्थान म्हणजे नदी. नदीमुळेच मनुष्य स्थिर झाला, सुसंस्कृत झाला. सिंधू, गंगा, गोदावरी, नाईल असो की टायग्रिस-युफ्रेटिस. अशा सगळ्या नद्यांनी जीवन फुलवलं. जगातील सर्व संस्कृतीनं नदीला ‘माय’ म्हटलं. या मायने शेतीला पाणी दिलं. भटकंती थांबवून माणसाला स्थिर केलं. गावं वसवली, शहरं उभी केली. ज्या नदीनं आपल्याला इतकं दिलं, तिच्याशी आज आपण कसं वागत आहोत, हे पाहून ती आज रागावली, कोपली, रुसली.