sahityasamrat acharya atre birth anniversary
sahityasamrat acharya atre birth anniversarysakal

कऱ्हेचे अन् मुठेचे पाणी!

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्माला १३ ऑगस्ट २०२४ (आज) रोजी १२६ वर्षे पूर्ण झाली. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची जडणघडण ज्या सासवड आणि पुणे शहरात झाली, त्याविषयीच्या आठवणी.
Published on

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्माला १३ ऑगस्ट २०२४ (आज) रोजी १२६ वर्षे पूर्ण झाली. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची जडणघडण ज्या सासवड आणि पुणे शहरात झाली, त्याविषयीच्या आठवणी.

सासवडचे सुपुत्र साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्माला १३ ऑगस्ट २०२४ रोजी १२६ वर्ष पूर्ण होतात. आचार्य अत्रे साहित्यिक, कवी, नाटककार, वक्ते, राजकारणी,शिक्षक, विडंबनकार आणि कलाकार, चित्रपटनिर्माते होते. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील अफाट कर्तृत्व वाचून ‘अत्रे एक होते का अनेक?’ असा वाचकांना प्रश्न पडतो. १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवडमध्ये त्यांचा जन्म झाला. तेराव्या वर्षपर्यंत ते सासवडला एम.ई.एस विद्यालयात शिकत होते. या काळात सासवडशी जुळलेले घट्ट नाते त्यांनी जन्मभर जपले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com