ढिंग टांग : लोकतंत्र अने चूंटणीयंत्र | Dhing Tang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : लोकतंत्र अने चूंटणीयंत्र

ढिंग टांग : लोकतंत्र अने चूंटणीयंत्र!

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.

बप्पोरना टाइम. ब्रेकफास्टला अजून वेळ आहे. बंगल्याच्या पायऱ्यांवर श्रीमान मोटाभाई गुडघे चोळत चिंताग्रस्त अवस्थेत बसले आहेत. हिरवळीवर जमा झालेल्या सुप्रसिद्ध मोरांना श्रीमान नमोभाई योगासने शिकवीत आहेत. योगासने केल्याशिवाय दाणे मिळणार नाहीत, असे पुन:पुन्हा बजावत आहेत. हवे आगळ…याने की अब आगे.

मोटाभाई : (सुस्कारा टाकत) पती गयो!

नमोभाई : (मोरांना मयुरासन शिकवत) …एऊ ना कर, ए मोरभाई! मोडु असा जमीनला टेकवायच्या अने पिसारा उप्परथी! हांऽऽ…एमनेएमज!! (मोटाभाई इथे हताश होतात. त्यांना शीर्षासन करावेसे वाटते. तेवढ्यात-) अरे मोटाभाई, तुम्ही कश्याला टेन्शन घेते? हुं छुं ने? मैं हूं ना!!

मोटाभाई : (कंटाळलेल्या मोरांकडे सहानुभूतीने पाहात) …आवती चूंटणीमधी आपला कसा होणार?

नमोभाई : (विजयी मुद्रेने) एकदम ए-वन रिझल्ट होणार! तमे फिकर ना करो! बद्धा राज्य मां आपडा विजय सुनिश्चित छे!!

मोटाभाई : (डळमळीत विश्वासाने) तमारे मूंहमां घी-सक्कर! पण मने तो कोन्फिडन्स नथी!! बंगालमध्ये पण मला कोन्फिडन्स होता, पण ममतादिदीए सूपडा साफ किधा!!

नमोभाई : (धीर देत) अरे, तमे तो आपडा चूंटणीयंत्र छो! इलेक्सन मसीन!!

मोटाभाई : (निराश मोरासारखे मान खाली घालून) डोंबलाचं इलेक्शन मशीन!

नमोभाई : (प्रोत्साहन देत) …छेल्ला वखत बद्धा इलेक्सनमां तमेज विनर हता!! भूली गया के? ए लोगो तो कहे छे के मोटाभाई तो कमळ पार्टीना इलेक्सन मसीन छे, काईपण करीने मोटाभाई चूंटणीमां वधारो नंबर लावीश!!

मोटाभाई : (हताशपणाने) पंजाब मां तो आपडो सूपडो साफ थई जशे! लखीने राखजो!!

नमोभाई : (समजूत घालत) अरे भाई, एऊ निरास ना होय! पंजाब, उत्तर प्रदेस, मणिपूर, अने गोवा बद्धा जग्या आपडीज पार्टी सत्ता मां आवीश, आ लखीने राखजो!! लिहून ठेवा!! (मोर गोंधळतात. काय लिहून ठेवावं? हे त्यांना कळत नाही…)

मोटाभाई : (इशारा देत) लोग कहे छे के आ मिनी लोकसभानी चूंटणी छे! छेल्ला वखत देसभर मां तमारी ‘नमो-लहर’ हती! ए वखत एऊ काई नथी! लहर नथी ने कहर नथी! मने तो बहु टेन्सन आवे छे! इलेक्सन कसा जिंकणार? (मोरांना हा मुद्दा पटतो. पण लहर नाही, असे म्हटले तर नमोभाईंची लहर फिरुन दाणे मिळणे मुश्किल होईल, या विचारानिशी एकदोन मोर पिसाराबिसारा फुलवून दाखवतात. नमोभाई खुश होतात…)

नमोभाई : (मोरांना चुचकारत) शाब्बाश, मारा मोर! आ जुओ, बरसात नथी, काई नथी, पण बेमोसम नाच्ये छे!

मोटाभाई : (बजावून सांगत) तुमच्या प्रचारसभा, रॅली, रोड शो, विमान शो, जहाज शो…काहीही होणार नाही! केंम्पेन कसा करणार? तुमच्या केम्पेन नाय झ्याला, तर व्होट कसा मिळणार? व्होट नाय मिळाला, तर सत्ता केवी रिते येणार?

नमोभाई : (द्रष्टेपणाने) हुं डिजिटल, अने सोसल मीडियाना वापर करणार! डोण्ट वरी!! क्यूं मोर?

मोटाभाई : (खचलेल्या सुरात) गेल्या टायमाला अखिलेशभाई अने आपडा राहुलभाईने सायकलउप्परथी च्यांगला केंम्पेन केला होता…आवती चूंटणीमां आ जोडी पण नथी! हवे शुं करवानुं? (इथे मात्र मोरांचा धीर सुटतो, आणि ते इतस्तत: पांगतात. असो.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top