लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श

समाजवादी विचारांचे भाष्यकार खासदार बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी आज २५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
खासदार बॅ. नाथ पै
खासदार बॅ. नाथ पैsakal
Updated on

समाजवादी विचारांचे भाष्यकार खासदार बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी आज २५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी विविध क्षेत्रांत योगदान दिले. त्यांच्या कार्याचे हे स्मरण...

नाथ पै अवघं ४८ वर्षांचं आयुष्य जगले; पण अतिशय संपन्न असा त्यांचा जीवनप्रवास होता. कोकणातील वेंगुर्ल्याचे रहिवासी असलेल्या नाथ यांचं शिक्षण झालं ते वेंगुर्ला, बेळगाव आणि पुण्यात. तारुण्याच्या उंबरठ्यावर, ऐन विशीत असताना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या आंदोलनात १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात नाथने उडी घेतली. पण त्याचवेळी आपल्या पोष्टात काम केलेल्या, शाळामास्तर म्हणून काम केलेल्या वडिलांची जी एक महत्त्वाकांक्षा होती की, आपला मुलगा गांधी-सावरकर-नेहरूंप्रमाणे बॅरिस्टर व्हावा, नाथने ती पूर्ण करण्याचं ठरवलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या कुटुंबीयांची इच्छा पूर्ण करावी, इंग्लंडमधल्या संसदीय लोकशाहीचा अन् तिथल्या राजकीय पक्षांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जायचं ठरवलं. बेळगावच्या रेल्वे स्टेशनवर त्यांना निरोप देण्यासाठी सुमारे पाच ते सहा हजार नागरिक, कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं सेवा दलाचे सैनिक आले होते. त्यातल्या अनेक जणांचे डोळे ओलावले होते. त्यांच्या लोकप्रियतेचे हे निदर्शक होते.

खासदार बॅ. नाथ पै
मोदी-बायडेन यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

साडेतीन वर्षांच्या शिक्षणानंतर १९५२ ची मुंबई विधानसभेची निवडणूक बेळगावमधून लढवण्यासाठी ते परतले. नाथ पै भारतात परतण्यापूर्वीच त्यांचा प्रचार सुरू झाला. त्यांनी अनेक सभा घेतल्या. काँग्रेसच्या उमेदवारासाठी स्वतः नेहरूंनी सभा घेतली. नाथ पै यांनी लोकांची मनं जिंकली, मात्र निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारानं जिंकली. आपली बॅरिस्टरीची राहिलेली एक परीक्षा देण्यासाठी ते पुन्हा इंग्लंडला गेले. लंडनच्या वास्तव्यात त्यांनी साने गुरुजींच्या नावे तिथं वसतिगृह उभारले. जर्मन भाषा आत्मसात केली. पुढे दक्षिण रत्नागिरीमधून नाथ पै यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. काँग्रेसचा प्रबळ उमेदवार असूनही त्यांनी ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. लोकसभेतील पहिल्या भाषणापासूनच त्यांनी ज्येष्ठ नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्लीतही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला पोषक वातावरण तयार होऊ लागले. लोकसभेच्या व्यासपीठावर नाथ पै यांनी मागास कोकणच्या विकासाचे प्रश्न, बेळगाव आणि सीमाभागातील लोकांच्या व्यथा, कोकण रेल्वेचा प्रस्ताव यांसारख्या अनेक प्रश्नांवर विशेषतः राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत अभ्यासूपणे आपली परखड भूमिका मांडून संसदेत एक वेगळाच दरारा प्रस्थापित केला.

१९५७, ६२ आणि ६७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षातर्फे त्यांनी कोकणचे समर्थपणे प्रतिनिधित्व केले. खासदार म्हणून संसदेत आणि आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून कोकणात त्यांनी केललं कार्य, त्यांनी लोकप्रबोधनासाठी घेतलेले प्रचंड कष्ट, तब्येतीची अजिबात पर्वा न करता त्यांनी देशभरात, विशेषतः कोकणातील गावागावांमधून केलेले दौरे याची माहिती आजच्या लोकप्रतिनिधींनी नुसती समजून घेतली तरी त्यांचं आयुष्य धन्य होईल. उत्तम संसदपटू असलेल्या नाथ पै यांची आपल्या विरोधातली भाषणंही ऐकण्यासाठी पंडित नेहरू, इंदिराजी, गोविंद वल्लभ पंत आवर्जून सभागृहात येत. ''Nath is the most successful leader of the most defeated party'' अशा शब्दांत आपल्या मित्राविषयी प्रभाकर पाध्ये यांनी भावना व्यक्त केली होती. हृदयविकाराचं दुखणं बळावलेलं असतानाही सीमाप्रश्नाबाबतच्या बेळगावमधल्या सभेत नाथ पै अत्यंत तळमळीनं बोलले. १७ जानेवारी १९७१ चं हे त्यांचं शेवटचं भाषण. थकलेल्या नाथ पै यांचं १८ तारखेला निधन झालं. आयुष्यभर त्यांनी सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात सकारात्मक प्रगती होण्यासाठी, लोकशाही आणि संसदेची प्रतिष्ठा राखण्यासाठी देशभक्ताच्या भूमिकेतून वाटचाल केली. त्यांना आपल्यातून जाऊन आता ५० वर्षे होऊन गेली. त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांच्या ऋणात राहतानाच देशहिताची समन्वयवादी भूमिका समजून घेऊन आपापली वाटचाल करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com