हौस ऑफ बांबू : मिशा, हशा...दाहीदिशा!

नअस्कार! आमच्या चाहत्यांनी (आणि वाचकांनी) नुसता ‘सरोज कुठं गेली, सरु कुठं आहे...’ असा नुसता धोशा लावला होता. शेवटी आल्ये एकदाची परत. झालं ना समाधान?
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Updated on
Summary

नअस्कार! आमच्या चाहत्यांनी (आणि वाचकांनी) नुसता ‘सरोज कुठं गेली, सरु कुठं आहे...’ असा नुसता धोशा लावला होता. शेवटी आल्ये एकदाची परत. झालं ना समाधान?

नअस्कार! आमच्या चाहत्यांनी (आणि वाचकांनी) नुसता ‘सरोज कुठं गेली, सरु कुठं आहे...’ असा नुसता धोशा लावला होता. शेवटी आल्ये एकदाची परत. झालं ना समाधान?

...तर सर्वप्रथम माझ्या सर्व चाहत्यांना नव्या वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा. गेल्या आठवड्यात आमचे परममित्र आणि मराठी साहित्यातले सार्वजनिककाका, थोर सतारवादक आणि चिवडेवाले रा. अशोकराव तथा विनायक नायगावकर यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला. त्यांना उदंड आणि निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो, ही प्रार्थना. तुमच्यासाठी ते कविवर्य नायगावकर असतील, पण आमच्यासाठी शतप्रतिशत नायगावकरकाका आहेत. किनई, मी आणि त्यांची पुतणी मृण्मयी दोघी भातुकलीच्या मैत्रिणी होतो. भातुकलीत भात (पक्षी : पोहे) शिजला, नि ‘कुकलची शिट्टी’ झाली की आम्ही काकांना वलणभात खिलवत असू. काका अजिब्बात खात नसत. पोहे न खाणारे काका शेवटी स्वत:च चिवडेवाले कसे झाले, त्याची ही गोष्ट.

काकांच्या पंचाहत्तरीच्या निमित्तानं मृण्मयीनं खूप गोड लेख समाजमाध्यमांवर लिहिला आहे. तो मुळात वाचा. बाकी ‘काका पचहत्तर’च्या निमित्तानं बऱ्याच जणांनी भराभरा लेख लिहून टाकले आहेत. आमचे कविदोस्त महेश केळुस्कर (बरें आसा मूं?) आणि कवियार अरुण म्हात्रे यांनीही ठरवून लेख लिहिले आहेत. आणखी एक ग्रंथमित्र शशिकांत सावंत आहेत. त्यांनी उगीचच काकांवर फिस्कारुन घेतलं आहे. आता वाढदिवसाला हे असलं काही लिहितात का? पण जाऊ दे.

आमच्या ओळखीचे नायगावकरकाका वेगळेच आहेत. ते अतिशय उत्तम चिवडा करतात. पोहे कसे भाजावेत? चिवडा हमखास कुरकुरीत होण्यासाठी नेमके काय करावे? शेंगदाणे नेमके खरपूस कसे तळावेत? खोबऱ्याचे काप किती एमेम जाडीचे असावेत? आदी सर्व मार्गदर्शन ते (विचारल्यास) आवर्जून करतात. आमचे काका नुसता चिवडा करत नाहीत, सतारसुध्दा वाजवतात. ते सतार शिकले आहेत, हे त्यांच्याकडे बघून कळतंच. त्यांना मिशा नसत्या, आणि (त्याऐवजी) मानेवर केस रुळलेले असते तर ते पं. रविशंकरांसारखे दिसले असते, असे मला कुणीसेसे सांगितले होते. असो. आमचे काका हल्ली बराच काळ आंग्लभूमीतच असतात.

तिथेही साहेब लोक ‘आय टेल यू, लाइक दॅट एटसेटरा’ (अनुवाद : तुम्हाला सांगतो, असं सगळं ते, वगैरे...) असं बोलू लागले आहेत, असं ऐकून आहे. खरं खोटं देव जाणे. एवढ्या कामातून वेळ मिळाला तर अधूनमधून ते कविताही करतात. त्यांनी नवी कविता केल्याची आवई उठून अनेकदा रसिकांची पळापळ झाली आहे. लगबगीनं जावं, तर नायगावकरकाका जुनीच कविता नव्या जागांवर ‘तुम्हाला सांगतो’ असा पंच घेत सादर करताना दिसतात. पण तेही एक असो.

दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये काकांची पंचाहत्तरी नुकतीच साजरी झाली. तिथं त्यांनीच एक किस्सा सांगितला. परदेशात एका हाटेलात बसलेले असताना सचिन तेंडुलकरनं ओळखलं आणि ‘मी तुमचा चाहता आहे’ असं सांगितलंन. (सेल्फीही घेतली असणार!) काकांनीही ‘वाहवा’ वगैरे म्हटलं. हा किस्सा काकांनीच सांगितला, पण सचिननं ओळख दाखवल्यावर काकांनी त्याला ‘काय करता आपण?’ हे विचारुन त्याची विकेट घेतली, ते सांगितलं नाहीन!! त्यावर त्याने ओशाळून ‘हल्ली घरीच बसून खातो’ असं सांगून काढता पाय घेतला, अशी माहिती माझ्याकडे आहे. आता बोला!

काहीही असो, आमच्या काकांना वाढदिवसाचं बिलेटेड अभीष्टचिंतन! हॅप्पी बर्थडे!! ‘वाटेवरच्या कवितां’नंतर ’कवितेच्या वाटेवर...’ तुमची वाटचाल दमदारपणे सुरु राहो, आणि वाटेवर (तुमच्याच शब्दात) कचऱ्यासारखा पडलेला निसर्गही येवो, ही वाट अशीच अखंड, अव्याहत सुरु राहो, या शुभेच्छा!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com