हौस ऑफ बांबू : उगीच कां ‘भांड’ता? गांजिता?...

100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan President Election : शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिकांची नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अविश्वास ठराव आणि निवडप्रक्रियेतील पेचामुळे अध्यक्षपदाची निवड चर्चेचा विषय ठरली आहे.
100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan President Election

100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan President Election

esakal

Updated on: 

नअस्कार! येत्या चार-पाच दिवसांत १००व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे कळणारच आहे, पण माझी उत्सुकता प्रत्यंचेसारखी ताणली गेली आहे.

ज्येष्ठ कादंबरीकार, प्रकाशक बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, दक्ष पत्रकार रमेश पतंगे, ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार आणि चित्रपटकथाकार आणि जवळजवळ सगळंच असलेले विजयराव कुवळेकर, कविवर्य प्रा. प्रवीण दवणे अशी नावं सध्या शर्यतीत आहेत. शेषराव मोरेंचंही नाव कुणीतरी घेतलं. लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळांची हॅटसुद्धा रिंगणात एकवार गरगरत येऊन पडली. पण यातली पहिली तीन नावं सध्या आघाडीला आहेत.

ज्या एकवीस सदस्यांनी ‘मसाप’च्या तिघा सूत्रधारांविरुद्ध अविश्वास ठराव आणला, त्यांनीच उपाध्यक्षांना पत्र पाठवून ‘या तिघांमधलं एक नाव निवडा’ असं ठणकावून सांगितलं आहे. लहानपणी आम्ही मुठीत दुसऱ्या हाताच्या बोटांचा पाचुंदा गप्पकन पकडून बोट निवडायचा खेळ खेळत असू. तसलाच प्रकार! शिवाय ही तिन्ही नावं तशी ‘गैरसोयी’ची नसतील, याची दक्षता बंडखोर एकवीस शिलेदारांनी आधीच घेऊन ठेवली आहे. कुठलंही बोट निवडा, अपनाच आदमी!

Loading content, please wait...