
ढिंग टांग
प्रिय मित्र मा. दादासाहेब बारामतीकर यांसी, अत्यंत तातडीने हे गोपनीय पत्र लिहित आहे. प्रकरणाला गंभीर वळण लागू पाहात आहे. काट्याचा नायटा होण्याच्या आतच यावर मार्ग काढावा लागणार, असे दिसते. गेले काही दिवस मी पाहातो आहे की आपले दोघांचेही जीवश्चकंठश्च मित्र ठाण्याचे कर्मवीर भाईसाहेब सध्या नाराज आहेत. हल्ली माझ्याशी नीट बोलेनासे झाले आहेत. परवा मंत्रालयात भेटले तेव्हा त्यांना सहज म्हटले की ‘येताय का चहाला?’ तर प्रश्नार्थक चेहरा करुन ते म्हणाले, ‘‘कशाला? चहा पिऊन काय उपयोग?’’ आणि निघून गेले…