
हौस ऑफ बांबू
नअस्कार! नव्हेंबरअखेरीस दिल्लीत प्रदूषणाने अतिशय निम्न पातळी गाठल्यामुळे खोकलासर्दीने राजधानी बेजार झाली होती, त्याच काळात साहित्य अकादेमीतील काही सदस्यांना उबळ येऊन जाग आली, आणि मराठीत कुणी प्रा. सुधीर नरहर रसाळ नामक एक सर्जनशील आणि साक्षेपी समीक्षक आहेत, याची त्यांना अचानक ओळख पटली. हा साक्षात्कारी क्षण होता. त्याखातर मी आधी साहित्य अकादमीचं, आणि नंतर डॉ. रा. रा. रसाळ तथा बापूसाहेबांचं अभिनंदन करत्ये!