

Dhing Tang: QR Code Identity Cards for Police Personnel and a Satirical Take on Fake Policemen
esaka
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांसी मी निवेदन करणार नामे बबन फुलपगार, पो. काँ. बक्कल नं. १२१२, कदकाठी अदमाशे ५ फू. ५ इं. उमर ४६, छाती २६, फुगवून २६च, वजन (बुटासकट) ४९, कडून कडकडीत साल्युट. स. न. वि. वि. सर्वप्रथम आपणांस दिपवाळीच्या शुभेच्छा. औंदा दिपवाळी जरा थंडी गेली. राऊण्डपला चार वेळा जाऊनही आमदनी नाही. दिवस कठीण आहेत. अशा काळात आमच्या चौकीतील एक सहकारी डिगंबरअन्ना (ब. नं. ४२०) आला आणि म्हणाला, ‘‘बबनशेठ, तंबाकू काढ, गवर्मेट आपल्याला क्रेडिट कार्ड देनार आहे. पाच-दहा लाखाचं लिमिट!! च्यामारी, मजा करा!’’ मला आच्चर्यच वाटले.