
Diwali Lanterns: Different types of lanterns and their political meanings, know how to choose the right lantern
Sakal
ढिंग टांग
आम्हाला कल्पना आहे की दिवाळीचे दिवस आहेत. फराळाची तयारी सुरू आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे खरेदीलाही वाव असल्याचा आमचा वहीम आहे. काही लोकांना खरेदी पर्वडते. लोकशाहीची विटंबना चालू असल्यामुळे दिवाळी साजरी करू नये, असे काहींना वाटते. आम्हालाही वाटते. पण तरीही काही प्रमाणात दीपावली साजरी करावी लागतेच. जनरीत आहे, काय क्रावे?
दीपावलीची चाहूल लागली की बाजारात दुकानांमध्ये नाना प्रकारचे कंदिल लटकलेले दिसतात. एखादा चांगलासा कंदिल आणून त्यात दिवा पेटवून तो दर्शनी भागात लटकावला की नकारात्मक ऊर्जा पळून जाते, तेजाचे तत्त्व दीपावलीचा आनंद द्विगुणित करते, असे शास्त्र सांगते. उदाहरणार्थ, घरातील ईडापीडा टळो असे कंदिलास सांगून तो पेटवून आम्ही तातडीने घराबाहेर पडलो, तेव्हा अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत ध्यानी आले की घरातील ईडापीडा आपणच असू!! नपेक्षा आपण कंदिल पेटवून बाहेर का पडावे? तातडीने परत फिरलो…