ढिंग टांग : चल यार, धक्का मार…!

जुना झालेला काम्प्युटर हे एक अवसानघातकी यंत्र आहे. कधी दगा देईल, सांगता येणार नाही. ऐनवेळी उजळलेला पडदा काळोखी करणे.
Dhing Ttang
Dhing TtangSakal

जुना झालेला काम्प्युटर हे एक अवसानघातकी यंत्र आहे. कधी दगा देईल, सांगता येणार नाही. ऐनवेळी उजळलेला पडदा काळोखी करणे, अचानक फाशी जाणे (पक्षी : हँग होणे), वेळीअवेळी उभ्या-आडव्या रेघांच्या रांगोळ्या काढणे, हवी ती फाइल बेलाशक डिलीट करणे, अशा प्रकारची अनेक कृष्णकृत्ये हे आधुनिक यंत्र करीत असते. तरीही त्यावांचून काही पर्याय नाही. मा.नमोजीभाई यांना ही यंत्राची चाल चांगलीच माहीत आहे. असली नाठाळ यंत्रे दुरुस्त करण्यासाठी त्यांनी मा. मोटाभाईंसारखा निष्णात तंत्रज्ञ नेमलेला आहे. मा. मोटाभाई कुठलेही यंत्र अचानक चालू करुन दाखवू शकतात किंवा चालत असलेले बंद पाडू शकतात. पण सध्या परिस्थिती थोडी बिकट आहे. सांप्रतकाळी समोर असलेले यंत्र औटडेटेड झाले असल्याने नवे मॉडेल आणण्याचा विचार पुढे आला आहे. अब आगे…

नमोजीभाई : सिस्टम खराब छे! रिबूट करवु पडसे! एऊ ना च्याले!! बहु आत्रंग यंत्र छे आ तो!!

मोटाभाई : (यंत्राशी खटपट करत) हूं ट्राय करीश! पण मारा एडवाइस छे के नवुज यंत्र मंगावीश तो सारु थईश!!

नमोजीभाई : अरे, नवु यंत्र केटला मेहंगा आवे छे! तमे कछु ओइल वगैरा नाखिने दुरुस्त करजो ने!

मोटाभाई : (गंभीरपणाने) सिस्टम रिबूट करवु पडशे!

नमोजीभाई : (गोंधळून) माने?

मोटाभाई : रिबूट माने बंद करवानु, अने पछी वापिस च्यालू करवानु! आ यंत्र जूना थई गया छे! माने औटडेटेड!

नमोजीभाई : असा कसा औटडेटेड झ्याला? शुं वात कहे छे? आ न्यू ब्रेंड तो छे!! जुओ ने! गेरंटी पिरिअड मां छे!!

मोटाभाई : (भराभरा बटणं दाबत) ना, भाई ना! एमां व्हायरस छे! नवु एंटीव्हायरस जरुरी छे! हार्ड ड्राइव पण बगडी गया छे! मेमरी एकदम फुल्ल छे! एटला बध्दा फाइल डिलीट करवु पडसे!! बेटरी पण डाऊन छे! आ माऊस काम नथी करतो! आ कीबोर्ड मां मट्टी जमी छे! डिस्प्ले मां लोच्यो छे! तमे आ खोका ओएलएक्स उप्परथी लगावी दो! ढाईसो- त्रणसो रुपिया आवीश!

नमोजीभाई : आ तो भंगारभाव छे! एऊ ना च्याले!! आपडी जूनी स्टेंडर्ड सिस्टम छे! जरा दुरुस्त करो ने!

मोटाभाई : (कुशल तंत्रज्ञाप्रमाणे) मी ट्राय करणार! पण च्यालणार, याची गेरंटी नाय घेणार!

नमोजीभाई : अरे मोटाभाई, आ तो तमारे बायें हाथ ना काम छे! तुम्ही काहीही दुरुस्त करु शकता ने! छेल्ला वखत तमने आपडी खटारा मोटर, नवु टायर लगावीने सुपरफास्ट, न्यू ब्रेंड स्पोर्टस कार बनावीं हती!!

मोटाभाई : (खांदे उडवत) टायर बदलवानो शुं फायदो? गाडी मां पेट्रोल तो जोइए!!

नमोजीभाई : (प्रयत्न न सोडता) करो, मोटाभाई, करो! दिल छोटा ना करो! तमें शुं जोईए?

मोटाभाई : (विचारपूर्वक) कोऑपरेशन!

नमोजीभाई : दिधा! आजे हुं तमे कोऑपरेसन मिनिस्टर बनावीश! खुश?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com