esakal | ढिंग टांग : जॉगोतिक हाश्यो दिन!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : जॉगोतिक हाश्यो दिन!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. बंगल्यातला फोन वाजतो. तो बंगालीत वाजतो, पण बिज्याच (पक्षी : दुसऱ्याच) लेंग्वेजमधी उचलला जातो. अब आगे…

नमोभाई : (प्रेमळ प्रतिसाद देत) कोण छे?

दिदी : (हर्षातिरेक आवरुन धरत) आमि दिदी बोलछी! आपनार?

नमोभाई : (दु:खी सुरात) अरे दिदीऽऽ…ओ दिदीऽऽ…तमने तो मारा सुपडा साफ करी नाख्यु! आ जो, आपडा मोटाभाई केटला रोए छे!

दिदी : उनको बोलना दिल छोटा नॉय कॉरनेका!

नमोभाई : (विव्हळत) मोटाभाई बहु दुखी छे! तमे एने समझ्यावो ने दिदी! मला जसा बंगाली कुर्ता पाठवते, तसा मोटाभाईने पण पाठवा ने!

दिदी : (दिलदारपणे) बिजॉय-पॉरॉजॉय शॉमान आछि! त्यांच्यासाठी आमि गान गाईछी, आपनार शुधो गाओ…(पावसाचे आनंदगान गात) बादल बाऊल बाजाय रे एकतारा…सारा बेला धरे झरो झरो झरो धारा…जामेर बने, धानेर खेते। आपन ताने आपनि मेते। नेचे नेचे हॉलो साराऽऽ…

नमोभाई : (दोन मिनिटे निपचित पडत)….!?

दिदी : (अंदाज घेत) दादाऽऽ…ओऽऽ दादाऽऽ! अरे ओ दादामोशाय! तुम किधोर हाय?

नमोभाई : (भानावर येत) छे छे, अहियांज छे!

दिदी : (खिजवत) शोंध्याकाळी आमच्या शेलेब्रेशानला येणार का आपनि?

नमोभाई : (कर्तव्यकठोरपणे) चूंटणीनंतर सेलेब्रेशन अलौड नाय हाय ! सेलेब्रेशन करीश तो तमारा नवु नवु सरकार बरखास्त करीश!!

दिदी : (बेफिकिरपणे) जाओ, आमि डोरबे ना! लोरबो, जीतबो, कोरबो!

नमोभाई : (हात वर करत) चूंटणी आयोग कहे छे! माझा काय ओब्जेक्शन नाय हाय! सेलेब्रेशन तो मने बहु आवडे छे!

दिदी : (ठणकावून) भॉलो खोबोर आछि! पण आमि शेलेब्रेशान कॉरणारच! मन आनंदाने भॉरुन गेलंय! मोरासारखं नृत्य कोरावंसं वाटतंय! (पुन्हा पावसाचे गाणे गात)… शोना कॉरे झिलमिल झिलमिल, ब्रिष्टी पॉडे टापुर टुपूर, टिप टिप टापुर टुपूर!! व्होटची ब्रिष्टी झाली, मोशाय! की शुंदोर…की दारुण!

नमोभाई : आमच्या दारुण लोच्या झ्याला त्याचा काय? मारा मन रोए छे!

दिदी : (डोळे फिरवत) रोएंगे हामारे दुश्मॉन!

नमोभाई : (घाईघाईत) अच्छा हवे हुं फोन रखीश! मने इम्पोर्टंट मीटिंग छे!

दिदी : (आणखी खिजवत) खेला होबे?

नमोभाई : झ्याला तो खेला कमी झ्याला के?

दिदी : (विजयी हास्य करत) हा हा हा हा!!

नमोभाई : एवढा हसायला काय झ्याला? कोणी केळीच्या सालवरुन पडला काय?

दिदी : (आणखी मोठ्यांदा हसत) जॉगोतिक हाश्यो दिन आछि! आपनि पण हसबो!

हाहाहाहा!!