
हौस ऑफ बांबू
नस्कार! विस्मरण होण्याच्या आत आधी टिळक रोडवरचं श्रीराम लागू रंग अवकाश गाठा आणि ‘फादर’ बघून या. खरं तर नका जाऊ! कारण ‘फादर’चे सगळे शो सोल्ड आऊट आहेत, असं कळलंय. कधीही विसरता न येण्याजोगा प्रयोग आहे, हे विसरण्याच्या आधीच सांगून टाकत्ये. विख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक नसिरुद्दिन शाह यांचा अभिनयाचा आणि नाट्यकलेचा स्तर किती उंच