ढिंग टांग : गलगोटिया पाळा, अज्ञान टाळा..!

गलगोटिया श्वानास प्राय: चार पाय असतात. शेपूट ऑप्शनल आहे व ती ॲक्सेसरीमध्ये येते. या जातीचे गलगोटिया हे नाव कसे पडले? त्याची एक मजेशीर कहाणी आहे.
Galgotia Dog Disrespected: Criticism at International AI Exhibition

Galgotia Dog Disrespected: Criticism at International AI Exhibition

esakal

Updated on

कुत्रा हा कुत्रा असला तरी त्याला कुत्रा म्हणणे भूतदयेला धरुन नाही. कुत्र्यास कुत्रा न म्हणता श्वान म्हणावे, किंवा मित्रश्वान म्हणावे. श्वान पाळणे हे माणुसकीचे सुभग दर्शनच आहे. जो मनुष्य श्वान पाळतो, त्यासोबत सकाळी (आणि संध्याकाळी) सडकेवर चक्कर मारतो. श्वानाचे स्वच्छताकर्म सुरु असताना तिसरीकडेच बघत हाताच्या मुठीत (नाक नव्हे, तर-) पट्ट्याची दोरी धरुन उभा राहातो. वेळवखत पाहून (खांब नच सांपडल्यास) आपुल्या श्वानास स्वत:चा पाय ऑफर करतो, तो खरा माणुसकीच्या धर्मास जागतो.

श्वानांच्या अनेक जातीप्रजाती असतात. उदा. पामरेनियन, आल्सेशियन, डाबरमन वगैरे. यातील गलगोटिया जातीचे श्वान अतिशय हुशार असतात. मालक सांगेल ते ऐकतात. त्यास दोरीने बांधिले नाही तरी चालते. इतके इमानदार जनावर पृथ्वीतलावर दुजे नाही. तरीही श्वान म्हटले की खोडकरपणा आलाच. हा खोडकरपणा मालकांस आवडतो, परंतु, इतरांस त्याचा त्रास होतो. कारण त्यांनी माणुसकीधर्म सोडून दिलेला असतो.

गलगोटिया श्वानास प्राय: चार पाय असतात. शेपूट ऑप्शनल आहे व ती ॲक्सेसरीमध्ये येते. या जातीचे गलगोटिया हे नाव कसे पडले? त्याची एक मजेशीर कहाणी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com