hous of bamboo
sakal
नअस्कार! गेले काही दिवस निपचित पडून होत्ये. कांदा, चप्पल हुंगून हुंगून शुद्धीवर येता येता पुन्हा बेशुद्ध पडत होत्ये. डॉक्टर म्हणाले, ‘कसला तरी मानसिक धक्का बसलाय! काही पाहिलं-ऐकलं-वाचलं का?’ मला बाई काईच आठवेना!
आत्ता आठवलं!! गेल्या आठवड्यात मराठी भाषामंत्री उद्योगजी सामंत यांनी पुण्यात येऊन १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जवळपास अठरा कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. अठरा कोटी! हा आकडा ऐकूनच मला अंधारल्यासारखं झालं. एरवी आम्ही संमेलनाला दोन कोटी देतो, यावेळी शंभरावं संमेलन असल्यामुळे तीन कोटी वाढवून देतोय. शिवाय नव्याण्णव नांदी संमेलनं भरवणार असल्याने त्याचे पाच कोटी वेगळे देतोय.