
इतिहास घडता घडता नवाच इतिहास घडला. जो घडायचा तो राहोन गेला. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असावे. नियती नावाची जी कोणी एक बया आहे, ती बोलते एक, करते एक आणि वागते तिसरेच. महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित टाळीप्रयोगापूर्वीच सन्नाटा पसरला. टाळी हुकणार, अशी चिन्हे निर्माण झाली. तोवर राज्यभर दोघा बंधूंच्या मनोमीलनाची होर्डिंगे लागली होती. कुणीतरी आपल्याला टाळी द्यायला येते आहे, या कल्पनेनेच बांदऱ्यात फटाके फुटू लागले होते. तेवढ्यात बारा वाजले. आय मीन, घड्याळात बारा वाजले…