

Marathi Valentine Search: Quest for a Perfect Partner in 'House of Bamboo'
sakal
न अस्कार! हातात गुलाबाची लालेलाल फुलं (लांब देठासकट) घेऊन ही अशी मी उभी आहे. कुणाला द्यावा गुलाब? गुलाब कुणाला द्यावा? द्यावा कुणाला गुलाब?अं अं अं? मनात अनेक रंगबिरंगी फुलपाखरं रुंजी घालत आहेत. ‘मोहुनिया तुज संगे नयन खेळले जुगार…’ हे जुनं गीत ओठांवर लिंबूसोड्यासारखे मिरमिरत्ये आहे.
…व्हॅलेंटाइनचा प्रेमदिन आला. या दिवशी आपल्या प्रेमाचा इजहार करायचा असतो नं? मग माझ्यासारखीनं कसं गप्प बसावं, अं? मी मराठीचा व्हॅलेंटाइन शोधत्ये आहे. मराठीला आधार देणारा, तिच्या साथीनं वाटचाल करणारा, एकनिष्ठ, प्रेमळ आणि रुबाबदार व्हॅलेंटाइन मी शोधत्येय.
तो उंचनिंच (टॉल), गव्हाळ (डार्क) आणि हँडसम (हँडसमच!) असावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि हो त्याला कविता कळायला हवी. (थोडीफार) विनोदबुद्धीही असावी. वर्षभर शोधतेय, हितं दिसं ना, थितं दिसं ना, शोधू कुटं (टिडँग) शोधू कुटं (टिडँग) शोधू कुटं (ट्राँऽऽइंग)…असं चाललं आहे.