
आजची तिथी : विश्वावसु नाम संवत्सर श्रीशके १९४७ चैत्र शु. द्वितीया.
आजचा दिवस : मंडेवार
आजचा सुविचार : गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा!
……………………
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) गुढी पाडव्याचे श्रीखंड नाही म्हटले तरी जास्तच झाले. श्रीखंडवाला, हल्दीराम की धरमपेठेतले बागे’ज श्रीखंड मागवावे? की घरीच चक्का टांगून बनवावे? या विचारात अठ्ठेचाळीस तास घालवल्यानंतर तातडीने निर्णय घेतला. प्रत्येक ठिकाणाहून एकेक किलो श्रीखंड आणले आणि शिवाय एक किलो चक्का घरातही टांगला!
पण…