

A Satirical Letter to ‘Uddhoji’ Amid Indigo Flight Chaos
sakal
प्रिय (माजी) ‘हे’ मा. उधोजीसाहेब, सप्रेम जय महाराष्ट्र. फारा दिवसात गाठभेट नाही. मागे एकदा (कधीतरी) सभागृहात येताजाता लिफ्टमध्ये भेटलो होतो. दालनात पुष्पगुच्छ घेऊनही आलेले आठवते. पण पूर्वीसारखी ती जेवणेभोजने नाहीत, बटाटेवडा नाही, काही नाही. जाने कहां गये वो दिन! यंदा नागपुरात तुमची भेट नक्की होणार, असे कळल्याने मी चक्क नवा शालू मागवलान! तुम्ही आमच्या नागपुरात याल, तो सुदिन! या, मी तुमच्यासाठी खास वडाभात आणि सांबारवडीचा बेत करीन हो!