

The Annual Ritual of New Year Resolutions
Sakal
हा हा म्हणता म्हणता (आणखी) एक वर्ष गेले. काही जणांचे हो हो म्हणताना गेले. काहींचे हीही करताना गेले. नव्या वर्षात संकल्प करायचे असतात. नव्या वर्षात काहीही झाले तरी हा हा म्हणायचे नाही, असा संकल्प काही जणांनी केला आहे. बऱ्याच जणांना संकल्प कसला करायचा हेच मुदलात सुचले नाही. तात्पर्य येवढेच की, संकल्पाशिवाय नवे वर्ष साजरे होऊ शकत नाही.