अपरात्रीच्या काळोखातचदार वाजले अवचित तेव्हाउठून पाहिले सावधतेनेदार किलकिले केले थोडे,उंबरठ्यावर कुणीच नव्हते…कुणीच नव्हते आसपासही-गदमदलेल्या आभाळाला भोसकणारे,पथदीपांच्या सभोवताली भिरभिरणारे,.तारेवरती बसून काही अमंगळाला बोलविणारे,निश्चल वृक्षांच्या फांद्यांवर अद्वातद्वा लंबकणारे,उजेड पाहून पाकोळीसम तिरमिरणारेकाहीच नव्हते सजीव बहुधावैशाखाच्या वणव्यामध्ये सारे काहीशिजून गेले, विरुन गेले…नकोनकोशा अशा अवेळीदारावरती टकटक ती मग केली कोणी?चोर असावा? किंवा काही पराशक्तीचानवा अघोरी खेळ असावा?किंवा कोणी अडला नडला याचक होता?.कळले नाही, कोण परंतु,नजरेला मग दिसले तेव्हा-फक्त उंबरा ओला होता,आणि लगतचा पायपोसहीगिच्च ओल ती मुरवत होता.ओळख पटली! -मनात म्हटले, येतो येतोम्हणता म्हणता खरेच आला,आला, आणिक अगोचरासमदारवटीचा उंबरठा तो भिजवून गेला!तशी तयाची वाट पाहताअर्धीमुर्धी रात गुजरली, खरेच आहे..याच्यासाठी तगमग होती, चिडचिड झाली,जीव उबगला पुरता अगदी, खरेच आहे.कंटाळाही कंटाळून तो निघून गेला,तेव्हा दारावरती याची टकटक झाली.अंत बघावा, जीव कुडीतून सांडून जावा,तेव्हा कोठे येतो हा तर निष्ठुर मेला!दूर पाहिले, हमरस्त्यावर नव्हती वर्दळ,पथदीपांच्या प्रकाशात अन तोही वेडाभिजून सारा चिंब होऊनी वाहत होता…मंद विजेरी हातामधली दावित होतीअंगणातल्या गूढ सावल्या,झोतामध्ये चाहूल लागूनभिंतीवरती उगा हालल्या…नीट पाहिले तेव्हा दिसले, अंगण सारे भिजले आहे,अंगणातल्या फरशीसह त्याभिंतीवरती अजून थोडी ओलहि आहे,अंगणातला पारिजातही उभा ओलसरफुलण्यासाठी पूर्ण अनावरजणु राधेच्या वाटेवरती.घनश्यामाचा अस्फुट वावररात्रीचा हा खेळ शुभंकरअजूनही पण सुरुच आहे…ज्येष्ठामध्ये येईल ऐसी अटकळ होती,परंतु, हा तर वैशाखातच उभा ठाकला.वणव्यावरती कोसळणाऱा पागल काळासैराटाच्या पाठी धावत शहीद झाला…दार उघडुनी सताड त्याला आत घेतले,‘असा अचानक? बैस, अरेव्वा, बरंय’ वगैरेसभ्यपणाच्या हथकंड्यांचे मग वापर झाले.‘आलास? ये, बैस’ म्हणालो, बसला पठ्ठ्या.गडवाभांडे पुढे करोनी म्हणून बसलो, ‘पाणी?’तेव्हा गडगडून तो हसता झाला!‘‘मलाच पाणी पाजायाला निघणारा तूकोण कोठला बाजिंदा रे?’’ असे म्हणाला.ओशाळून मी गडवाभांडे ठेवून दिधले,हातावरती गूळ खोबरे देत म्हणालो, ‘सॉरी, चुकले!’ओले कपडे बदलून तोही आडवा झाला.अंदमान अन दूर दक्षिणेकडून आला,असेल मोठा पल्ला मारुन बराच दमला!बघता बघता पठ्ठ्या तेव्हानिवांत घोरत झोपी गेला,सहज पाहिले-उंबरठ्याची ओल तेधवा, घरात आली.मनात आले, आला आला…पाऊस आला!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.