
हौस ऑफ बांबू
नअस्कार! पुणेकरांसमोर मी तर अगदी हातच टेकले आहेत. टेकले, मग जोडले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणात नुकताच पुणे पुस्तक महोत्सव पार पडला. तब्बल दहा लाख वाचकांनी या महोत्सवाला हजेरी लावली, आणि दणादण चार-पाच विक्रम मोडले. पंचवीसेक लाख पुस्तकं खरेदी केली, आणि निव्वळ पुस्तकांवर चाळीस कोटी रुपये उडवले. होय, उडवलेच म्हणणार मी!!