
political leader
Sakal
‘अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात पुराण्या दिल्लीत बंडवाले शस्त्रे परजत हिंडत. चांदणी चौकाशी घंटेवाल्याच्या मिठाईचा आनंद आणि गल्लाही लुटत. आणि मग त्यांची लढाईची ऊर्मी थंड पडे’, असे एका इंग्रज अधिकाऱ्याने लंडन येथे आपल्या वरिष्ठांना पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे म्हणे. घंटेवाल्याच्या मिठाईचा महिमा हा असा आहे. प्रसंगी तलवारीतही गोडवा आणणारे हे मिष्टान्नस्थान इतिहासात अमर आहे. त्या इतिहासाने लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आणखी एक कलाटणी घेतली.