
हौस ऑफ बांबू
नअस्कार! मला वेध लागले आहेत…संगीत मानापमानाचे. नाटक नव्हे, चित्रपट! आज नारायणराव बालगंधर्व असते तर प्रिमियरला त्यांनी पडद्यावर अत्तर शिंपडले असते. खुर्च्यांच्या हातात अत्तराचे फाये कोंबून ठेवले असते नि जाईजुईचे गजरे वाटले असते. मायबाप प्रेक्षकांच्या स्वागताला स्वत: उभे राहिले असते.