

Journey to Satara: Excitement and Anticipation
sakal
नअस्कार! सर्वप्रथम मी माझ्या लाखो चाहत्यांना (आणि थोड्या वाचकांना) नव्या वर्षाच्या शुभेच्छा आधीच देऊन टाकत्ये. नंतर भेट हुईल, न हुईल! कालच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीच्या आवारात मी हेच वाक्य थोडा मोठा उसासा टाकत एका पदाधिकाऱ्यासमोर (नाव मुळीच सांगायची नाही मी…) उच्चारलं, तर मेल्यानं तेवढाच मोठा सुस्कारा टाकलान, आणि म्हणाला, ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट..!’’ मी चडफडल्ये, मनात म्हटलं, ‘तूच ओंडका, मला ओंडका म्हणणारा तू कोण?’ जाऊ दे.