
स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : सकाळ आणि दुपार यांच्या मधोमधली.
‘मातोश्री’ सजली आहे. फुलांनी, पानांनी, नक्षीदार रांगोळ्यांनी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या मांडवात तीन टन डाळिंबांचे डेकोरेशन करणाऱ्या कलावंतांना घेऊन आलेल्या एका निस्सीम मावळ्याला त्याच ट्रकमध्ये बसवून परत धाडण्यात आलं. नाहीतर ‘मातोश्री’ फळांनी सजली असती! आज दादूसाहेबांचा वाढदिवस. पासष्टावा.